आई आली होती स्वप्नात माझ्या..

काल आली होती आई पुन्हा स्वप्नात माझ्या
म्हणाली तुला आठवते का रे राजा

काळजीने तुझ्या कोंडलेले श्वास
धोपट्यात तुझा अजून येतो रे वास

पाठावर डोके ठेवून सांडली होती लाळ
ओलसर स्पर्श तो अजून जाणवतो रे बाळ

बोळक्यात लुक्लुक्लेला तुझा लहानगा दात
आणि पहिले पाउल टाकताना धरलेला माझा हात

शाळेमध्ये जावे म्हणून पुरवलेले हट्ट
सहलीसाठी तू मला मारली मिठी घट्ट

म्हणे कॉलेज मध्ये जाताच तुला झाला होता प्यार
आणि म्हणाला होतास कसा के तिचा स्पर्श अजून जाणवतो रे यार

सून मुख पाहून मला किती झाला  होता हर्ष
जग माझे निघाले सुखात नाहून आणि
तुझ्या चिमुकल्याचा उत्कर्ष

तुझ्या रेसेशनच्या वार्ता ऐकून भीती मज वाटे
पाहून तुझ्या कपाळी आठी अश्रू डोळ्या माझ्या दाटे

जरी असले मी अडाणी तरी मला समजते रे बाळा
माझा छकुला तू तुझा आहे मला लळा

जीव माझा गुंतला तुझ्यात तरी का मी रे अडगळ
आली बायको घरात म्हणून करतो का माझा छळ

किती हाल सोसले किती भोगल्या रे यातना
तुझ्या आनंदासाठी बोलले नवस केल्या किती रे प्रार्थना

आज जातो माझा जीव दे एक वचन मला मरताना
तुझ्या वडिलांची घे काळजी पाहिलंय मी त्यांना झुरताना

देव माणूस तो रे साधा, केली त्यांनी स्वतःची  होरपळ
जरी मला दिले तू अश्रू , नको करू त्यांचा रे तू खेळ

आज जाई माझा जीव येईल हा वेळ ही तुझ्यावर
जरी चुकलास आता तरी वेळीच तू सावर

सांगताना सगळे आईचे डोळे भरल्यासारखे वाटले
आठवून चुका नभ माझ्या डोळ्यात दाटले…