आरझू

ना ये फलसफा है, ना ये कहानी है..
ये तो हक़िक़त है, दिल कि झुबानी है…

तो तरुण, देखणा आपल्या लुक्स विषयी विशेष जागरूक. MCA 1st year त्यामुळे आपल्या laptop, sheets इत्यादीसाठी विशेष दक्ष. एके दिवशी पुण्याहून नांदेडला ट्रेन ने परतताना घडलेला हा अविस्मर्णीय प्रसंग.
घाइगर्दीत ट्रेनमध्ये चढल्यानंतर त्याला लक्षात आले कि, त्याच्या seat वर ती बसलेली आहे. तो मुळातच सनकी. याने उभ्याउभ्याच तिला खडसावले. ती शांतच. याने जिभेचा पट्टा सैल सोडला. तरी ती शांतच. फक्त नजर वर करून तिने याच्याकडे पाहिले पण चकार शब्द बोलली नाही. हा मात्र चिडला. नाविलाज म्हणून तिच्या समोरच्या seat वर बसला. कधी नव्हे ते आज घडले अख्खे compartment रिकामे होते जणूकाही दैव याच्यावर हसत होते. ती, तो आणि दोन वृद्ध जोडपी होती. याने आपला laptop काढला व काहीतरी करत बसला.
याची नजर तिच्याकडे गेली. किती सुंदर होती ती. जणूकाही अप्सराच. तिचे ते ओठ जणू गुलाबाच्या पाकळ्या. परंतु तिच्या त्या अत्यंत सुंदर टपोर्या डोळ्यांत याला एक रुक्षपणा वाटला एक अनामिक दुख वाटले. ती जर याची पत्नी असती तर? किती आवडली होती ती याला. परंतु त्या संगणकीय हृदयात शिस्तीला वेगळी जागा होती. का म्हणून ती याच्या जागेवर बसली? इतर चारही सहप्रवाशांशी ती बोलत होती परंतु याच्याकडे बघणेसुद्धा टाळत होती. पण का?
आता याला राहवेना. याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात तिचा mobile खणखणला. तिच्या वडिलांचा फोन होता तो. ते स्टेशनवर थांबले आहेत हे एव्हाना याच्या लक्षात आले होते. तिचे बोलणे संपल्यावर याने स्वतःचा परिचय करून दिला. नाव, गाव, कॉलेज सर्वकाही सांगितले. ती ऐकत होती पण बोलली काही नाही फक्त नाव सांगितले “आरझू”.
एवढ्यात तिचे स्टेशन आले. compartment मध्ये एक पन्नाशीची व्यक्ती चढली. बहुधा ते तिचे वडील असावेत. त्यांनी तिला दोन्ही हातानी पकडले नंतर मागून आलेल्या एका मुलाने आणलेल्या wheelchair वर तिला बसवले आणि घेऊन निघूनही गेले. तिने जाताना याला फक्त एकदा वळून पाहिले. ती अपंग होती आणि याने तिला किती सुनावले होते. Sorry सुद्धा म्हणाला नव्हता हा पठ्ठा.
ती निघून गेली आणि हा तिला पाठमोरी पाहत राहिला. आज तो तिला या अथांग विश्वात शोधात आहे. कोणास ठावूक ती याला भेटेल न भेटेल.

मीच तो.

3 thoughts on “आरझू

What's on your mind?

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s